पणदरेत एसटीबस अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणदरेत एसटीबस अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
पणदरेत एसटीबस अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

पणदरेत एसटीबस अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

sakal_logo
By

माळेगाव, ता. २१ : पणदरे (ता. बारामती) येथील नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची एसटीबस अभावी गैरसोय होत आहे. याबाबत
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांनी एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची समस्या निर्माण होत असताना संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा नाहक त्रास केवळ विद्यार्थ्यांनाच नाही, तर महिलांसह इतर प्रवाशांनाही सहन करावा लागतो. विशेषतः एसटीच्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत योग्यती कार्यवाही होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे, असे तावरे यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. दरम्यान, विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे बारामती एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
01170

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00762 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..