बारामतीत वेश्याव्यवसायाविरुद्ध पोलिस कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत वेश्याव्यवसायाविरुद्ध पोलिस कारवाई
बारामतीत वेश्याव्यवसायाविरुद्ध पोलिस कारवाई

बारामतीत वेश्याव्यवसायाविरुद्ध पोलिस कारवाई

sakal_logo
By

माळेगाव, ता. १२ : बारामती औद्योगिक विभागामध्ये आरटीओ कार्यालयाच्या समोरील राजलक्ष्मी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने अचानकपणे राजलक्ष्मी लॉजवरती छापा टाकला, या कारवाईमध्ये तीन पुरुष व स्त्रिया वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या.
हवलदार शिवदास काटकर यांनी आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाविरुद्ध फिर्याद दिली. त्यामध्ये किरण बापू पाटील (रा. हाजी मलंग रस्ता एकवीरा देवी पिसवली ता. भिवंडी, ठाणे), युवराज लोखंडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), विठ्ठल चव्हाण (सध्या रा. राजलक्ष्मी लॉज बारामती) या संशयित आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेता तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00785 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..