Pune : द्राक्ष, डाळिंब पीक परिसंवादास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune
द्राक्ष, डाळिंब पीक परिसंवादास प्रतिसाद

Pune : द्राक्ष, डाळिंब पीक परिसंवादास प्रतिसाद

माळेगाव : नवतंत्र, नवसंकल्पनांची शेतीला जोड देण्याच्या उद्देशाने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात द्राक्ष व डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.

यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्र, शासनाचा कृषी विभाग, आत्मा संस्था (पुणे) आणि इस्राईल केमिकल लिमिटेड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादाला पुणे, सातारा येथील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार होते. यावेळी इस्राईल केमिकल लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी,  इस्राईलचे शास्त्रज्ञ डॉ.मेनाचेम असारफ, शास्त्रज्ञ डॉ. उरी येर्मीयाहू, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, महाराष्ट्र डाळिंब संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काटे, द्राक्ष संशोधन केंद्र (पुणे) शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत निकुंभे, डॉ. युक्ती वर्मा,  डाळिंब संशोधन केंद्राचे (सोलापूर) शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अनंत कुलकर्णी यांनी इस्राईल केमिकल लिमिटेड या कंपनीमार्फत माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन कसे केले जाते. याबाबत मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ डॉ. उरी येर्मीयाहु यांनी डाळिंबामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा डोस डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत दिल्यानंतर शेतकऱ्यांसाठी उपयोग असलेल्या खत मात्रा शोधून काढल्याचे सांगितले. डॉ. प्रशांत निकुंभे यांनी द्राक्ष पिकात कॅनोपी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. संजय बिराजदार यांनी प्रास्ताविक तर डॉ. मिलिंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संतोष गोडसे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00789 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..