माळेगावच्या ८८ कोटींच्या प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावच्या ८८ कोटींच्या प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता
माळेगावच्या ८८ कोटींच्या प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता

माळेगावच्या ८८ कोटींच्या प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता

sakal_logo
By

माळेगाव, ता. १५ ः माळेगावला पुरेसे पाणी देण्याच्या उद्देशाने येथील नगरपंचायतीने ८८ कोटींची महत्वकांक्षी वाढीव पाणी पुरवठा योजना अमलात आणण्याचे निश्चित केले आहे. या योजनेच्या प्रकल्प अहवालास (डीपीआर) शासनस्तरावर तांत्रिक मान्यता मिळाली, हे होत असताना सांडपाणी व्यवस्थापन केंद्राचा ४३ कोटींचा, तसेच घनकचरा व्यवस्थापनाचा ५ कोटींचा प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी प्रस्तावित केला आहे. दैनंदिन कामकाज होत असताना गावात बौद्धनगर, साठेनगर भागात दीड कोटींची मंजूर विकास कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी जाहीर केली, तसेच त्यांनी माळेगावला हेतुपुरस्सर बदनाम करणाऱ्या तक्रारदारांबद्दलही नाराजी व्यक्त केली.


माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आली, परंतु मुख्याधिकारी पद वगळता शासनाकडून येथे अद्याप आवश्यक ते मनुष्यबळ मिळाले नाही. निवडणूक झाली नसल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक मदतीला नाहीत. असे असतानाही ८८ कोटींची नविन पाणी पुरवठा योजना, ४३ कोटींची सांडपाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनाचे आवश्यक प्रकल्प अहवाल नगरपंचायतीने अंतिम टप्प्यात आणले आहेत याबाबतची माहिती स्पष्ट करीत मुख्याधिकारी स्मिता काळे पत्रकारांशी बोलत होत्या.

माळेगावात सध्या कोट्यवधी रुपयांची मुख्य रस्ते बांधणीसारखी कामे वेगाने सुरू आहेत. याकडे लक्ष वेधत काळे म्हणाल्या, ‘‘बारामती नगरपरिषेनंतर आता माळेगाव नगरपंचायत नव्याने नावारूपाला येऊ पाहत आहे. त्याच हेतूने माजी पदाधिकारी, नगरपंचायत प्रशासनाने एकोप्याच्या जोरावर काम केल्याने शासनस्तरावर माळेगावने ‘माझी वसुंधरा अभियाना’त राज्यात तिसरा क्रमांक पटकविला व १ कोटींचे बक्षिस मिळविले.’’

वसुंधरा अभियानांतर्गत माळेगाव राज्यात नावारूपाला आले, परंतु काहींकडून या गावाची नाहक बदनामी होते, अशी खंत व्यक्त करीत मुख्याधिकाऱ्यांनी काही तक्रारदारांना उर्वरित मूलभूत समस्या सोडविण्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे आवाहन केले.
....
मूलभूत गरजांसाठी निधी अपुरा
माळेगाव नगरपंचायतीकडे पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमातून महिन्याला केवळ साडेतीन ते चार लाख महसूल मिळतो. त्या आधारेच पाणीपुरवठा वीज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन कार्यालयीन खर्च आणि गावच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात. नागतळे भागात अनधिकृत लोकवस्ती असल्याने नियोजित विकास आराखडा शासनस्तरावर राबविता येत नाही, तसेच मूलभूत समस्यांसाठी खर्च करता येत नाही. गावात ११ सार्वजनिक शौचालये कार्यान्वित आहेत. त्यांना स्वच्छ करण्यासाठी केवळ दोन कर्मचारी आहेत. माधवानंद टॉकीजशेजारी गैरसोय विचारात घेता येथे नविन शौचालय उभारणी पुढील १० दिवसांत सुरू होणार आहे, असे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी स्पष्ट केले.
.....

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00790 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..