ऊस कार्यक्षेत्र वाढीवरून सत्तासंघर्ष ‘माळेगाव’च्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये रंगला कलगीतुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस कार्यक्षेत्र वाढीवरून सत्तासंघर्ष 
‘माळेगाव’च्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये रंगला कलगीतुरा
ऊस कार्यक्षेत्र वाढीवरून सत्तासंघर्ष ‘माळेगाव’च्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये रंगला कलगीतुरा

ऊस कार्यक्षेत्र वाढीवरून सत्तासंघर्ष ‘माळेगाव’च्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये रंगला कलगीतुरा

sakal_logo
By

माळेगाव, ता. २५ : विस्तारीकरण झालेल्या ‘माळेगाव’च्या १५ लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच उच्चांकी ऊसदरासाठी बारामतीमधील नव्याने १० गावांचे ऊसाचे कार्यक्षेत्र वाढविणे क्रमप्राप्त आहे, अशी भूमिका घेत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे संचालक मंडळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी जाणार आहे. त्याउलट माळेगावच्या विरोधकांनीही कारखान्याचे कार्यक्षेत्रवाढीचा विषय सभासदांच्या नुकसानीचा असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनीही अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा विरोधकांची मोट बांधत गावोगावी जाऊन सभासदांमध्ये जनजागृती करण्याचे जाहीर केले. साहजिकच कारखान्याच्या वार्षिक सभेगोदरच ‘माळेगाव’मध्ये कार्यक्षेत्रवाढीच्या मुद्यांवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याचे स्पष्ट होते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने हंगामातील गाळप क्षमता १५ लाख टनापर्यंत पोचली आहे. त्या तुलनेत कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या जमिनी दूषित पाण्याने खराब झाल्याने सरासरी एकरी ऊसाचे उत्पन्न घटले आहे. या प्रतिकूल स्थितीमुळे माळेगावच्या प्रशासनाला बाहेरच्या तालुक्यातून महागडा गेटकेन ऊस आणावा लागतो आहे. त्यामुळे नोंद नसलेला रिकव्हरी कमी असलेला आणि वाहतूक जास्त असलेला खर्चिक ऊस नाइलाजास्तव माळेगावला घ्यावा लागतो. या परिस्थितीमुळे सभासदांच्या तुलनेत गेटकेनधारकांनाही उच्चांकी ऊसदर द्यावा लागतो. त्यामुळेच बारामती तालुक्यातील ‘सोमेश्वर’चे कार्यक्षेत्र असलेल्या १० गावांचा समावेश नव्याने माळेगावकडे करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी कळविली.

दुसरीकडे, वाढीव गावांमुळे मूळच्या सभासदांच्या मुलांवर शैक्षणिकदृष्ट्या अन्याय होईल, शिवतीर्थ मंगल कार्यालयासह कारखान्याच्या अधिकच्या सेवासुविधा नव्याने होऊ पाहत असलेल्या सभासदांना द्याव्या लागतील, कमी रिकव्हरीचा ऊस घ्यावा लागून त्याचा ऊसदरावर परिणाम होईल, असे विविध मुद्दे उपस्थित करीत विरोधकांनीही नीरा वागजसह गावोगावी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे, अॅड. जी. बी. गावडे, संपतराव देवकाते, विठ्ठलराव नाळे आदी पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध आक्रमक झाले आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रवाढीच्या मुद्द्यांबरोबरच नीरा डावा कालवा अस्तरीकरणाला विरोध केला आहे. तसेच नीरा नदीमधील प्रदूषण थांबविण्याचाही मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ३९०० रुपये ऊसदर माळेगावच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशीही मागणी तावरे करीत आहेत.

वाढीव गावांतील २९ हजार टन ऊस गाळप!
माळेगावला सभासद होऊ पाहत असलेल्या नवीन गावांतील शेतकऱ्यांची संख्या १४५० इतकी आहे. त्यामध्ये जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, अंजनगाव, काऱ्हाटी, कारखेल, नारोळी, कोळोली, साबळेवाडी, देऊळगाव आदी गावांचा समावेश आहे. अर्थात हे शेतकरी सोमेश्वर कारखान्याचे सभासद आहेत. असे असतानाही संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गतवर्षी माळेगावने २९ हजार टनांपेक्षा अधिकचा अतिरिक्त ऊस वेळेत गाळप केल्याची नोंद आहे.