‘माळेगाव’ची कामगिरी उल्लेखनीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माळेगाव’ची कामगिरी उल्लेखनीय
‘माळेगाव’ची कामगिरी उल्लेखनीय

‘माळेगाव’ची कामगिरी उल्लेखनीय

sakal_logo
By

माळेगाव, ता. ६ : ‘‘माळेगाव साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ८७ लाख लिटरची अल्कोहोलनिर्मिती आणि वीजनिर्मिती प्रकल्पातून २५ लाख युनिटची झालेली निर्यात विचारात घेता कारखान्याच्या संचालक मंडळाची आॅफ सीझनमध्ये उल्लेखनीय कामगिरी पुढे आली आहे. विजेतून दीड कोटीपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले, तर अल्कोहोलमधून अंदाजे ४० कोटी रुपये किमतीचे उत्पादन मिळविण्यात कारखान्याला प्रथमच यश मिळाले. अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांच्या संचालक मंडळाने योग्य नियोजनाच्या जोरावर आगामी ऊस गळीत हंगाम सुरू होण्याअगोदरच डिस्टलरी व वीज प्रकल्पातून चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले,’’ अशी माहिती संचालक मदनराव देवकाते व योगेश जगताप यांनी दिली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा दसरा सणाच्या मुर्हुर्तावर (ता. ५) आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमिवर बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला. कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव व सौ. मीनल जाधव या दांपत्याच्या हस्ते व अध्यक्ष तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्निप्रदीपन समारंभ झाला. याप्रसंगी संचालक देवकाते, जगताप यांनी माहिती दिली.
यावेळी देवकाते म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याने आगामी ऊस गळीत हंगामातही १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट ठेवले.’’ ‘‘आगामी हंगामाच्या अनुषंगाने आवश्यक ती यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्तीची कामेही पूर्णत्वाला आणली आहे,’’ अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, सुरेश देवकाते यांनी दिली. यावेळी अनिल तावरे, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, रंजन तावरे, स्वप्नील जगताप, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी देवकाते, मंगेश जगताप, प्रताप आटोळे आदी उपस्थित होते.
‘‘माळेगाव कारखाना प्रशासनाला मागील गळीत हंगामात तब्बल सात कोटी रुपये किमतीचा ३० हजार टन बगॅस वाचविण्यात यश आले होते. त्या बगॅसचा आॅफ सीझनमध्ये डिस्टलरी व वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी उपयोग झाला. एरवी तीन ते चार कोटी रुपयांचा बगॅस बाहेरील कारखान्यांकडून विकत घ्यावा लागत होता. परंतु, यंदा पहिल्यांदाच आॅफ सीझनमध्ये पुरेसा बगॅस असल्यामुळे डिस्टलरी १२५ दिवस कार्यरत राहिली आणि अल्कोहोलचे ८१ लाख अधिक लिटरचे उत्पादन मिळाले. त्याची अंदाजे किंमत सुमारे ४० कोटी रुपये इतकी होते. तसेच, वीज प्रकल्पातून २५ लाख युनिट वीज निर्यात झाली व त्यातूनही दीड कोटींचे उत्पन्न मिळण्यास मदत झाली. याशिवाय शासनाच्या वीजमंडळाकडून डिस्टलरी प्रकल्प चालविण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त विजेतही बचत झाली,’’ असे जगताप यांनी सांगितले.

माळेगाव कारखान्याचाने मागील पाच वर्षाच्या तुलनेत अध्यक्ष तावरे यांच्या संचालक मंडळाने तीन वर्षातच सभासदांना प्रतिटन ४४१ रुपये अधिकचे दिले. त्यामुळे कारखान्याचा कारभार उत्तमच आहे. फक्त गावे जोडण्याचा मुद्दा आम्हाला खटकतो, अशी भावना सभासद रावसाहेब वणवे, श्री. शितोळे आदींनी व्यक्त केले.

माळेगाव (ता. बारामती) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्निप्रदिपनप्रसंगी उपस्थित मान्यवर.