शिवनगर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुभाष देवकाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनगर कामगार पतपेढीच्या 
अध्यक्षपदी सुभाष देवकाते
शिवनगर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुभाष देवकाते

शिवनगर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुभाष देवकाते

sakal_logo
By

माळेगाव, ता. १३ ः माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत असलेल्या शिवनगर साखर कामगार सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी सुभाष देवकाते यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, उपाध्यक्षपदी धनंजय शिंदे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या निवडणूक प्रक्रियेत निळकंठेश्वर कामगार पॅनेलला निर्विवाद यश मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवरती सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) मिलिंद टमसाळे यांच्या आधिपत्याखाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या वेळी संचालक किसन वामन कोकरे, संदेश कृष्णा गावडे, संजय श्रीपती जगताप, उमेश अर्जुन तावरे, सूर्यकांत चंद्रराव धुमाळ, अरुण कृष्णाजी पाटील, शेखर सर्जेराव देवकाते, कल्याण पोपटराव भगत, बाळासाहेब बुवासाहेब मोरे,गणेश किसन पवार,सोमनाथ कोंडिबा चव्हाण, कुसुम नामदेव चव्हाण उपस्थित होते. निवड प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी कामगार नेते अशोकराव देवकाते, सुरेश देवकाते, चंद्रशेखर जगताप, विनोद तावरे, हनुमंतराव देवकाते, बापूराव कोकरे, लक्ष्मण जगताप, धनंजय आटोळे, बी. एच. कोकरे, वसंतराव खलाटे, संग्राम जगताप आदींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.