शारदानगर येथे उद्यापासून स्वयंसिद्धा युवती संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारदानगर येथे उद्यापासून
स्वयंसिद्धा युवती संमेलन
शारदानगर येथे उद्यापासून स्वयंसिद्धा युवती संमेलन

शारदानगर येथे उद्यापासून स्वयंसिद्धा युवती संमेलन

sakal_logo
By

माळेगाव, ता. १४ ः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदानगर (ता. बारामती) येथे १०वे स्वयंसिद्धा युवती संमेलन आयोजित केले आहे. तीन दिवसीय (बुधवार ता. १६ ते शनिवार १९ नोव्हेंबर) होणाऱ्या युवती संमेलनात विद्यार्थिनींच्या आयुष्याला आकार देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, शारदाबाई संस्थेचे प्राचार्य श्रीकुमार महामुनी यांनी दिली.
संमेलनात युवतींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्राची ओळख करून दिली जाते. तसेच त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा, पुढील आयुष्यात त्यांनी विविध क्षेत्रात योगदान द्यावे, नेतृत्व गुण विकसित होण्यासही वरील उपक्रमाची मदत होणार आहे. संमेलनाचे उद्‍घाटन बुधवार (ता. १६) रोजी सायंकाळी ४ वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या वनिता बोराडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अॅग्रीकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच शनिवार (ता. १९) नोव्हेंबर रोजी वरील संमेलनाचा समारोप आहे. यादिवशी राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, इंद्रजित देशमुख हे विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत.