Wed, March 29, 2023

मेडद येथून दोन गायांची चोरी
मेडद येथून दोन गायांची चोरी
Published on : 2 December 2022, 1:11 am
माळेगाव, ता. २ : मेडद (ता. बारामती) येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोर बांधलेल्या दोन गायी चोरट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेत चोरून नेल्या. या गायांची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये इतकी आहे. या चोरीप्रकरणी महादेव पांडुरंग पानगे (वय ५०, व्यवसाय शेती, रा. मेडद) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली.