Mon, Jan 30, 2023

कत्तलीसाठीची जनावरे
जळगावमध्ये पकडली
कत्तलीसाठीची जनावरे जळगावमध्ये पकडली
Published on : 9 December 2022, 9:11 am
माळेगाव, ता. ९ : जळगाव क.प. (ता. बारामती) येथे बेकायदेशीररीत्या गोवंशाची १६ जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने घेऊन जाताना महिंद्रा कंपनीची पिकअप टेम्पो माळेगाव पोलिसांनी पकडला. त्याचा चालक व वाहक दोघेही पळून गेले आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नंदकुमार गव्हाणे यांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी चार लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो जप्त केला. तसेच, फरारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस नाईक सानप हे करत आहेत.