पणदरेत निकालाबाबत तालुक्यात उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणदरेत निकालाबाबत तालुक्यात उत्सुकता
पणदरेत निकालाबाबत तालुक्यात उत्सुकता

पणदरेत निकालाबाबत तालुक्यात उत्सुकता

sakal_logo
By

माळेगाव, ता. १८; पणदरे (ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या उस्फूर्त मतदानाचा विचार करता येथील सत्ताधारी व विरोधी नेतेमंडळींनी निवडणूक जिंकणारच असे दावे - प्रतिदावे केले आहेत. तालुक्यात पणदरे गावाला राजकियदृष्ट्या प्रतिष्ठा आहे. गावात १५ जागांसाठी ३६ उमेदावार निवडणूक रिंगणात आहेत, तर थेट जनतेमधून सरपंच होण्यासाठी ४ जणांनी ही निवडणूक चुरशीची केली आहे. यामुळे निकालाबाबत तालुक्यात उत्सकता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्ताने झालेल्या मतदान दिवशी आज येथील उमेदवारांसह नेतेमंडळींनी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
माळेगाव साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक पण पणदरे गावचे रहिवाशी असलेले अनेक नेतेमंडळी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उतरले होते. ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, माजी संचालक. एस.एन.जगताप यांनी भैरवनाथ सिद्धेश्वर पॅनेलच्या बाजूने काम केले. दरम्यान, पणदरेतील उमेदवारांनी एकाविचाराने अनेकवर्षे राजकारण केले, परंतु यंदाच्या निडणूकीत एकमेकांपुढे उभे ठाकले होते. त्यामुळे प्रतिष्ठित ठरलेल्या या लढतीमध्ये मतदार कोणाला पसंती देतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.