माळेगाव येथे वाहत्या पाण्यात आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव येथे वाहत्या पाण्यात आढळला मृतदेह
माळेगाव येथे वाहत्या पाण्यात आढळला मृतदेह

माळेगाव येथे वाहत्या पाण्यात आढळला मृतदेह

sakal_logo
By

माळेगाव, ता.२८ : बावीस फाटा खांडज (ता. बारामती) येथे नारायण रामलिंग दळवी (वय ६२, रा. चोरमलेवस्ती, माळेगाव बु. ता. बारामती) यांचा मृतदेह वाहत्या पाण्यामध्ये आढळला. या घटनेची माहिती त्यांचा मुलगा राजेंद्र दळवी यांनी माळेगाव पोलिस ठाण्याला दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली.
दरम्यान, नारायण दळवी हे सोमवारी (ता. २६) सकाळी बावीस फाटा फलटण रोड परिसरात सकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परत आले नव्हते. दरम्यानच्या कालावधीत नातेवाइकांनी शोध घेतला. त्यावेळी मंगळवारी (ता. २७) बावीस फाटा येथे वाहत्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला. दळवी यांच्या डोक्यासह शरीरावर खोलवर जखमा असल्याने हा घातपात तर नाही ना, अशी शंका परिसरातील नागरिक घेत आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक किरण अवसर यांनी तपास करत आहेत.