माळेगावात ट्रॉली उलटून ऊसतोडणी तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात ट्रॉली उलटून
ऊसतोडणी तरुणाचा मृत्यू
माळेगावात ट्रॉली उलटून ऊसतोडणी तरुणाचा मृत्यू

माळेगावात ट्रॉली उलटून ऊसतोडणी तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

माळेगाव, ता. ३० : माळेगाव (ता. बारामती) साखर कारखाना कार्यस्थळालगत वाघमोडे वस्ती येथील २२ फाट्यामध्ये उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातात एका १९ वर्षीय ऊस तोडणी युवकाचा मृत्यू झाला. कृष्णा वसंत जाधव (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), असे त्याचे नाव आहे. कृष्णा हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे घटनास्थळी त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता.
माळेगाव कारखाना कार्यस्थळावर २२ फाट्याच्या भराव्यावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण नव्याने झाले आहे. उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या साइटपट्टीवर आली असता माती खचली आणि दुर्घटना घडली, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली. या अपघातानंतर स्थानिक रहिवाशांसमवेत शेतकी अधिकारी सुरेश काळे, अधिकारी वाघ यांच्यासह पोलिस यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु अपेक्षित यश आले नाही.
दरम्यान, माळेगाव हद्दीत सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु, संबंधित ठेकेदार या रस्त्यांच्या साइडपट्ट्या मजबूत करत नाहीत. परिणामी लहानमोठे अपघात घडत आहेत, अशी माहिती गौरव जाधव यांनी दिली.