''माळेगाव''चा ३१९ कोटींचा प्राप्तिकर माफ

''माळेगाव''चा ३१९ कोटींचा प्राप्तिकर माफ

माळेगाव, ता.११ : माळेगाव साखर कारखान्याचा व्याजासह सुमारे ३१९ कोटींचा प्राप्तिकर माफ तर झालाच, शिवाय या प्राप्तिकरापोटी सन १९९२ पासून आजवर भरलेली ५ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी धोरणामुळे माळेगावसह इतर सहकारी साखर कारखान्यांच्या मागे लागलेला प्राप्तिकराचा ससेमिरा तर थांबलाच, शिवाय सक्तीने वसूल केलेला कर आता व्याजासह परत मिळणार असल्याने सभासद शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एफआरपीपेक्षा जादा ऊस दराला प्राप्तिकरातून वगळण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून संबंधित सहकारी साखर कारखाने न्यायालयात लढा देत होते. त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील कारखांदारांनी वरील समस्येविरुद्ध संघर्ष केला होता. त्या लढ्याला बुधवार (ता. १) रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम स्वरूप आले.या प्रक्रियेत सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. देशात १० हजार कोटीपैकी तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर फक्त महाराष्ट्रातून जाणार होता. त्यातून आता महाराष्ट्रातील सहकारी कारखानदारांची सुटका झाली आहे. उसाला एफआरपी किंवा एसएमपीपेक्षा जास्त दिलेला दर कारखान्यांचा नफा समजून त्यावर प्राप्तिकर लावला होता. तो कर आता पुर्णतः माफ झाल्याने कारखांदारांच्या डोक्यावरील टांगती तलवार बाजूला गेली आहे, अशी माहिती भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे यांनी स्पष्ट केली.

गेल्या अनेक वर्षांपासून जादा दरावरील प्राप्तिकर मागे घेण्याची मागणी साखर उद्योगाची होती, यातून आता सुटका होईल. केंद्राने अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी विशेष करून सहकारी साखर उद्योगासाठी घेतलेला निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात सहकारी साखर कारखानदारी चालणे अतिशय मुश्कील झाले आहे. सहकारी साखर कारखानदारांसाठी प्राप्तिकराचा सकारात्मक निर्णय झाल्याने पुणे जिल्ह्यातच काय, तर पुर्णतः देशभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- युवराज तावरे, उपाध्यक्ष, जिल्हा भारतीय युवा मोर्चा

एफआरपीपेक्षा जादा ऊसदराला प्राप्तिकरातून वगळणारा निर्णय खरेतर साखर उद्योगाच्या दृष्टीने ऊर्जितावस्था आणणारा आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखानदारांना यापुढे अनावश्यक आर्थिक आणि कायदेशीर त्रास सहन करावा लागणार नाही. सहकारावर आधारित विकास ही संकल्पना इथून पुढे दृढ होण्यास मदत होईल.
- दिलीप खैरे, माजी सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

कारखान्यांचा ताळेबंद सुधारण्यास होणार मदत
महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सक्तीने वसूल झालेला अंदाजे एक हजार कोटींचा प्राप्तिकर जवळपास १३२ साखर कारखान्यांना परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यानेही आजवर साडेपाच कोटी रुपये कर रूपाने भरलेले आहे. अर्थात ही रक्कम व्याजासह परत मिळाल्यास कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. तसेच जे कारखाने आर्थिक दृष्ट्या अडचणित आहेत, त्यांचाही काहीसा ताळेबंद सुधारण्यास मदत होणार आहे, असे मत माळेगावचे संचालक नितीन सातव, सुरेश खलाटे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com