शारदाबाई पवार महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारदाबाई पवार महाविद्यालयात
मार्गदर्शन कार्यशाळेला प्रतिसाद
शारदाबाई पवार महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळेला प्रतिसाद

शारदाबाई पवार महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळेला प्रतिसाद

sakal_logo
By

माळेगाव, ता. १८ ः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नेट सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांना परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, बदललेली परीक्षा पद्धती, त्याचा अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन आदींसारख्या विषयांच्या अनुषंगाने वरील कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दरम्यान, शारदानगर येथील राज्यस्तरीय नेट सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन मधोजी महाविद्यालयाचे (फलटण) प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी केले, तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पनवेल-मुंबई येथील प्रा. मनोज सुपेकर, सी. के.ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सुपेकर यांनी परीक्षेसाठी आवश्यक प्रश्नसंच कसे सोडवायचे, त्यासाठी वेळेचे गणित कसे ठेवावे , याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी सुसंवादाच्या माध्यमातून विषय समजून घेतले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी, उपप्राचार्य प्रा. ए. एस. कदम, मानवी संसाधन व्यवस्थापक गार्गी दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आश्लेषा मुंगी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस.टी. तरटे यांनी, तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. पी. खारतोडे यांनी केले.