माळेगावात कोयत्या गँगची 
दहशत पसरणाऱ्याला बेड्या

माळेगावात कोयत्या गँगची दहशत पसरणाऱ्याला बेड्या

माळेगाव, ता. १६ ः माळेगाव (ता.बारामती) येथे समाज माध्यमाद्वारे कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या संशयित आरोपी स्वप्निल महादेव देवळकर (वय २३, रा. शिवनगर माळेगाव कारखाना) याला पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. माळेगाव बुद्रुक पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. आरोपी स्वप्निल देवळकर यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात यापूर्वीचा ३०७ प्रमाणे जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. या आरोपीने समाज माध्यमावर स्वतःचा फोटो अपलोड करून त्यावर ‘कोयता गॅंग माळेगाव बुद्रुक, ३०२’ असे कॅप्शन टाकून माळेगाव बुद्रुक व परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. यात्रा कालावधीत फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर संबंधित आरोपी हल्ला करणार असल्याबाबत माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर यांनी स्वप्निल देवकर याला अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com