
बारामतीमध्ये रविवारी उद्योग मेळावा
माळेगाव, ता. ३ ः शारदानगर (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र, दे आसरा फाउंडेशन पुणे, शारदा महिला संघ, बारामती बिझनेस ग्रुप आणि महाराष्ट्र लेडीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ७ मे २०२३ रोजी उद्योजक मेळावा घेतला आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता शारदानगर येथील अटल इन्क्युबेशन सेंटर इमारतीच्या सभागृहामध्ये वरील उद्योग मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यामध्ये व्यवसाय वाढीचे तंत्र आणि मंत्र याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच व्यवसायासाठी विविध बँकांची माहिती, शासकीय योजनांबाबतही चर्चा होणार आहे. या उद्योजक मेळाव्यामध्ये महिला, पुरुष, तरुण आणि ज्यांचे उद्योग सुरू आहेत, अशा सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना उपस्थित राहता येणार आहे. बचत गटाचे उद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेती खते औषधे दुकानदार, हॉटेल व्यवसाय, किराणा दुकानदार, गॅरेज इत्यादींनाही या मेळाव्यात उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्योजकांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करावी. https://bit.ly/3NrhPHA अधिक माहितीसाठी ८२७५५७३२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.