Thur, Sept 21, 2023

बारामतीत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
बारामतीत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
Published on : 13 May 2023, 9:36 am
माळेगाव, ता.१३ ः दारूच्या नशेत येऊन आम्हा शिवीगाळ प्रकरणी पारवडी (ता. बारामती) येथे दोघांनी गावडे कुटुंबीयांना दगडाने जबर मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. १२) घडली.
त्याप्रकरणी तुकाराम विठ्ठल गावडे (वय ४०, रा. पारवडी) यांनी दत्तू गावडे, सागर गावडे (दोघे रा.पारवडी) यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैद्यकीय अहवाल व फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी दत्तू गावडे, सागर गावडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहे.