हरवलेल्या सात मोबाईलचा माळेगाव पोलिसांकडून शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरवलेल्या सात मोबाईलचा  
माळेगाव पोलिसांकडून शोध
हरवलेल्या सात मोबाईलचा माळेगाव पोलिसांकडून शोध

हरवलेल्या सात मोबाईलचा माळेगाव पोलिसांकडून शोध

sakal_logo
By

माळेगाव, ता. १३ : माळेगाव (ता. बारामती) पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात नागरिकांचे हरविलेले व गहाळ झालेले मोबाईलचे शोध लावण्यास पोलिसांना यश आले.
माळेगाव पोलिस ठाण्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे अनुषंगाने पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या आदेशाने पोलिस नाईक ज्ञानेश्वर सानप, सायबर सेल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी तांत्रिक विश्‍लेषण करून एकूण ७९ हजार हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल नुकतेच ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी तक्रारदारांना संबंधित मोबाईल सुपूर्द केले. त्यामध्ये हेमंत उत्तम वाघमोडे (रा. शिवनगर, माळेगाव), मनोज पांडुरंग झेंडे (रा. २२ फाटा खांडज), समीर सुरेश जाधव (रा. निंबूत, ता. बारामती), श्रेयस दीपक कोकरे (रा. आबाजीनगर-धुमाळवाडी) यांना तक्रार दिनाचे औचित्य साधून पोलिस अधिकारी किरण अवचर यांनी मोबाईल परत केले. तसेच, यापूर्वी प्रफुल्ल जयवंत भोसले (रा. नीरावागज), वृषाली दगडे (रा. बारवनगर कांबळेश्वर, ता. बारामती), रोहित कृष्णराव जगताप (रा. पवईमाळ, ता. बारामती) यांचे मोबाईल माळेगाव पोलिस ठाण्याकडून परत दिले.
या यशस्वी कामगिरीबद्दल माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.