
मुळशीच्या पत्रकार संघ अध्यक्षपदी शेंडे
माले, ता. २७ : राज्यात तालुका स्तरावरील पहिले पत्रकार भवन उभारलेल्या ‘पत्रकार संघ मुळशी’ची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यात
संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे नीलेश जयवंत शेंडे, सचिवपदी लोकमतचे कालिदास नगरे यांची, तर कार्याध्यक्षपदी पुढारीचे सागर शितोळे यांची बिनविरोध निवड झाली.
पत्रकार संघाच्या पौड (ता. मुळशी) येथील पत्रकार भवनात संघाचे मावळते अध्यक्ष रमेश ससार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तत्पूर्वी मावळते अध्यक्ष ससार यांनी मागील कार्यकारिणीचा कार्यअहवालाची माहिती दिली.
निवडलेली कार्यकारिणी - उपाध्यक्ष- सचिन विटकर, केदार कदम, सहसचिव- राजेंद्रकृष्ण कापसे, खजिनदार- महादेव पवार, कार्यकारिणी सदस्य- बबन मिंडे, दत्तात्रेय जोरकर.
या वेळी माजी अध्यक्ष धोंडिबा कुंभार, राजेंद्र मारणे, रमेश ससार, संजय दुधाणे, महेश मालुसरे, मकरंद ढमाले, दत्तात्रेय उभे, प्रदीप पाटील, साहेबराव भेगडे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00201 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..