महाराष्ट्राच्या विकासासाठी मुळशीचा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राच्या विकासासाठी मुळशीचा बळी
महाराष्ट्राच्या विकासासाठी मुळशीचा बळी

महाराष्ट्राच्या विकासासाठी मुळशीचा बळी

sakal_logo
By

माले, ता. ३ : ‘‘महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती मिळावी, यासाठी मुळशीचा बळी दिला गेला. म्हणूनच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली. सदसद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने मुळशीकरांच्या प्रती कृतज्ञ राहून त्यांना मदत करायला हवी,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मुळशी सत्‍याग्रहाच्‍या शताब्‍दीनिमित्‍त सत्याग्रहाचे प्रणेते विनायक भुस्कुटे लिखित ‘मुळशी सत्याग्रह’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन १ मे रोजी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मुळशी धरण परिसरातील वाघवाडी (ता. मुळशी) येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी, लेखिका नंदिनी ओझा, प्रकाशक अनिल पवार, भुस्कुटे यांचे नातू विद्याधर भुस्कुटे व नात सून वृंदा भुस्कुटे, मुळशी सत्याग्रहाचे अभ्यासक बबन मिंडे, माजी आमदार शरद ढमाले, शांताराम इंगवले, रामचंद्र ठोंबरे, रवींद्र कंधारे, कोमल वाशिवले, कालिदास गोपालघरे, चंद्रकांत भिंगारे, अविनाश बलकवडे, राम गायकवाड, सचिन खैरे, विनायक ठोंबरे, श्रीकांत कदम, गणपत वाशिवले, विजय ढमाले, नंदूशेठ वाळंज, अंकुश वाशिवले, अर्चना वाघ, प्रकाश वाघ, स्वाती वाशिवले, समीर सातपुते, सोनल शेंडे, एकनाथ दिघे, शरद शेंडे, अनिल आधवडे आदी उपस्थित होते.
दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, राजेश सातपुते, मंदार मते, चेतन कोळी, जिंदा सांडभोर, मारुती गोळे, नीलेश शेंडे, उमेश वैद्य, विवेक देशमुख, सुभाष वाघ, हर्षद राव, हरीश गवई या सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

परकीय आणि स्‍वकीय सत्तांमधील फरक शासनाने जाणवून दिला पाहिजे. हा केवळ मुळशी धरणग्रस्‍तांचा प्रश्‍न नसून, संपूर्ण महाराष्‍ट्राचा प्रश्‍न आहे. उशीर झाला आहे. परंतु, मुळशीकरांच्या प्रती कृतज्ञ राहून त्यांना मदत करायला हवी.’’
- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक

मुळशी सत्‍याग्रहाची माहिती घेताना १०० वर्षांपूर्वी लढलेल्‍या या लढ्याची व्‍याप्‍ती समजल्‍यावर आम्‍ही अचंबित झालो. या लढ्यातून मार्गदर्शन घेत आम्ही नर्मदेचा लढा लढू शकलो.
- नंदिनी ओझा, लेखिका

देशाच्या विकासासाठी जे प्रकल्प उभारले जातात, त्याच्या लाभावर पहिला अधिकार हा विस्थापितांचा असतो. राष्‍ट्राच्‍या विकासात योगदान देणारे मुळशी धरणग्रस्‍त या देशाचे नागरिक नाहीत का?
- श्रीपाद धर्माधिकारी

सरकार व टाटा कंपनीने मुळशी धरणग्रस्तांना ते राहत असलेले घर त्यांच्या नावावर करून देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांना त्यांचा मूलभूत हक्क द्यावा.
- अनिल पवार, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान

Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00204 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top