संभवे येथे ८७ टक्‍के सनदांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभवे येथे ८७ टक्‍के सनदांचे वाटप
संभवे येथे ८७ टक्‍के सनदांचे वाटप

संभवे येथे ८७ टक्‍के सनदांचे वाटप

sakal_logo
By

माले, ता. १७ ः ‘स्‍वामित्व’ योजने अंतर्गत संभवे (ता. मुळशी) येथील ग्रामस्‍थांना घरांच्‍या सनदेचे वाटप करण्‍यात आले. ११६ सनदांपैकी दिवसभरात ८७ टक्‍के सनदांचे वाटप करण्‍यात आले.

काही दिवसांपूर्वी संभवे गावठाणातील मिळकतींचा ड्रोनने सर्व्‍हे करण्‍यात आला होता. त्‍यानंतर चौकशी अधिकारी नेमून धारक घोषित करण्‍यात आले. सार्वजनिक रस्‍ते, मंदिर, शाळा, इत्‍यादी सार्वजनिक वास्तूंचेही सर्व्‍हेक्षण करण्‍यात आले. त्‍यानुसार आता सनद तयार करून ग्रामस्‍थांना वाटप करण्‍यात आले.

ग्रामपंचायत ८ अ मध्‍ये केवळ क्षेत्र नमुद होते. सनदेमध्‍ये मिळकतीचा अचूक नकाशा, लांबी, रुंदी नमुद आहेत. पुढील टप्‍प्‍यात प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहेत. तयार झालेले प्रॉपर्टी कार्डचे शासन स्‍वतः ग्रामस्‍थांना वाटप करेल. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे सर्व्‍हेअर रोहन कडू, संभवेचे उपसरपंच हनुमंत जोरी, पोलिस पाटील कविता जोरी, आदी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सनद व प्रॉपर्टी कार्डमुळे घरांच्‍या, मिळकतीची मोजणी करणे, मिळकत गहाण ठेऊन कर्ज घेणे, विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे ग्रामस्‍थांना शक्‍य होणार आहे, अशी माहिती सर्व्‍हेअर रोहन कडू यांनी दिली.

MLE22B00403

Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00210 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top