
पालक, बालकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
माले, ता. १ : मुळशी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पालक व बालकांना आपत्ती व्यवस्थापन व स्वसुरक्षेचे धडे देण्यात आले. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या श्री शिवसमर्थ बचत गटाच्या वतीने आयोजित प्रशिक्षणात तालुक्यातील १० गावातील ७२ प्रशिक्षणार्थी, पालक सहभागी झाले होते.
पाणी, आग, वादळ नैसर्गिक आपत्ती काळात स्वतःचा बचाव, संरक्षण करण्याची पध्दत. पाण्याच्या परिसरात कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, पाण्याच्या परिसरात लावलेल्या सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे महत्व याची माहिती देण्यात आली. जलपर्यटन करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाण्यात पडल्यावर सुरक्षितपणे वाचवण्याचे,
तसेच आपत्ती व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या फोल्डिंग बोटींची जोडणी कशी करावी तसेच, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध व सुटका कशी करतात याचे प्रात्यक्षिक आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख प्रमोद बलकवडे, धनंजय मानकर व सहकारी यांनी प्रशिक्षणार्थी मुले व पालकांना दाखवले.
दरम्यान, प्रशिक्षणार्थ्यांनी सेनापती बापट स्मृतीस्तंभ माले, हुतात्मा नाग्या कातकरी वसतिगृह नूतन इमारत, शिळेश्वर वसतिगृह, स्वामी विवेकानंद विद्यालय असदे या ठिकाणी भेटी दिल्या. अनेक वर्षांपासून धरणभागातील नागरिकांना बोटीच्या माध्यमाने वाहक म्हणून सेवा बजावणारे अनिल आमले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी वाघवाडीच्या सरपंच अर्चना वाघ, शिवसमर्थ बचत गटाचे संस्थापक चिंतामणी चितळे, अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे, सचिव सचिव योगेश गोसावी, बचत गटाचे सदस्य उपस्थित होते. जितेश रसाळ, श्रीहरी वाघ, सुभाष वाघ, महेश मोहोळ यांनी या शिबिराचे नियोजन केले होते. वाघवाडी ग्रामपंचायत व वडगाव ग्रामस्थांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींची भोजन व्यवस्था केली.
----
00419
Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00218 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..