दुचाकीला पीकअपची धडक; माले येथे दोन मुलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीला पीकअपची धडक; माले येथे दोन मुलांचा मृत्यू
दुचाकीला पीकअपची धडक; माले येथे दोन मुलांचा मृत्यू

दुचाकीला पीकअपची धडक; माले येथे दोन मुलांचा मृत्यू

sakal_logo
By

माले, ता.१९ः पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर माले (ता.मुळशी) गावच्‍या हद्दीतील ‍कमानी समोरील रस्‍त्‍यावर शनिवारी (ता.१८) रात्री आठ वाजता पिकअपने
दुचाकीला दिलेल्‍या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांचा मृत्‍यू झाला. या अपघातात सौरभ दत्तात्रेय भोसले, कुणाल दिलीप भोसले (दोघांचेही वय समजू शकले नाही. दोघेही रा.वळणे, ता.मुळशी) यांचा मृत्‍यू झाला. पिकअप चालक स्‍वप्नील रमेश पळसकर, (वय २९ रा.पळसे, ता.मुळशी) याच्‍यावर पौड पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर सौरभ व कुणाल हे त्‍यांच्‍या दुचाकीवरून शनिवारी रात्री पुणे बाजूने मुळशी बाजूला चालले होते. माले येथील कमानीसमोर आल्‍यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्‍या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत सौरभ व कुणाल हे दोघेही गंभीर जखमी होऊन त्‍यांचा मृत्‍यू झाला. निष्‍काळजीपणाने वाहन चालवून मुलांच्या या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्यामुळे पोलिसांनी पिकअपचालक पळसकर याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00223 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top