‘अंधारबन’मध्ये पुण्यातील पर्यटक बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंधारबन’मध्ये पुण्यातील पर्यटक बेपत्ता
‘अंधारबन’मध्ये पुण्यातील पर्यटक बेपत्ता

‘अंधारबन’मध्ये पुण्यातील पर्यटक बेपत्ता

sakal_logo
By

माले, ता. २२ : पिंपरी (ता. मुळशी) येथील अंधारबन परिसरात ट्रेकसाठी जातो, असे सांगून शनिवारी (ता. १८ बाहेर पडलेला पर्यटक पिंपरी परिसरातून चार दिवसांपासून बेपत्ता‍ झाला आहे. ओंकार विजय शेटे (वय २२, रा. खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे), असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, शनिवारी (ता. १८) सकाळी सात वाजण्याच्या दरम्‍यान अंधारबन येथे ट्रेकसाठी जात असल्याचे सांगून ओंकार हा घराबाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली, पण काही माहिती मिळाली नाही. त्‍यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी खडकमाळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधत ओमकार हा हरवल्याची फिर्याद दिली. त्यानुसार खडक पोलिसांनी पुणे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, पौड पो‍लिस यांच्‍या मदतीने तपास सुरु केला. पिंपरी दरी पॉइंट ओंकार याची दुचाकी बेवारस आढळून आली. शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मुळशी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, रायगड आपत्‍ती व्‍यवस्‍थापन यांच्‍या मदतीने जवळच्‍या परिसरात असलेल्या जंगलात, दरीत शोधकार्य केले.
दरम्‍यान, ओंकार याच्‍या मोबाईलचे लोकेशन कोकणातील निजामपूर मनोऱ्याच्‍या परिसरात आढळले. त्‍यानंतर बंद झाले. त्यामुळे अंधारबन व दरीच्‍या खालील बाजूने, वरील बाजूने व जंगलात शोध घेण्‍यात आला. परंतु, तो मिळून आला नाही. रात्री उशिरा अंधार व पाऊस आणि धुक्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. गुरुवारी सकाळी पुन्‍हा शोधकार्य सुरु ठेवण्‍यात येणार आहे.
या शोधकार्यात पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, तहसीलदार अभय चव्‍हाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक विनायक देवकर, सचिन शिंदे, ईश्वर काळे, शिवदुर्ग टीम सुनील गायकवाड, राजेंद्र कडू , महेश म्हस्ने, रतन सिंग, आदित्य पिलाणे, रायगड टीमचे शेलार मामा, अक्षय झोरे, प्रतीक शेलार, प्रमोद शेलार, अरुण वाघमारे, विठ्ठल जाधव, प्रशांत शेलार, आकाश झोरे, प्रकाश झोरे, संतोष कोकरे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन प्रमोद बलकवडे, सूरज मारणे, गौरव धनवे, सागर खराडे, पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्‍थ यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00226 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top