मुळशी धरणातील साठा ''प्‍लस''मध्‍ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी धरणातील साठा ''प्‍लस''मध्‍ये
मुळशी धरणातील साठा ''प्‍लस''मध्‍ये

मुळशी धरणातील साठा ''प्‍लस''मध्‍ये

sakal_logo
By

माले, ता. ९ ः मुळशी धरण परिसरात गेल्‍या आठ दिवसांपासून सुरु असलेल्‍या जोरदार पावसामुळे मुळशी धरणाच्‍या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. जूनच्या अखेरीस वजा (मायनस) टक्‍केवारीत असलेला साठा ''प्‍लस''मध्‍ये येण्‍यास सुरूवात झाली. धरण सुमारे १४ टक्‍के भरले आहे. आज शनिवार (ता. ९) संध्‍याकाळपर्यंत धरणात सुमारे ३. २५ टीएमसी उपयुक्‍त साठा झाला आहे.
जून अखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्‍याने धरणातील उपयुक्‍त पाणीसाठा पूर्णपणे संपून मृतसाठ्यापर्यंत पोहोचला होता. जुलैच्‍या सुरवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावण्‍यास सुरवात केली. ताम्हिणी, पिंपरी, आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, नांदिवली, शेडाणी, मुळशी, वळणे परिसरात जोरदार पाऊस झाला. डोंगरावरून येणाऱ्या पाण्‍याने ओढे, नाले, धबधबे प्रवाहित होऊन वाहण्‍यास सुरवात झाली आहे. त्‍यांनतर पाणीसाठ्यात वाढ होऊन ''प्‍लस''मध्‍ये आला. मागील तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.
मुळशी धरण परिसरात शनिवारी सकाळी नोंदलेला गेल्‍या चोवीस तासांतील पाऊस मिलीमीटरमध्‍ये (कंसात या हंगामातील एकूण पाऊस) पुढीलप्रमाणे. ताम्हिणी १९४ (१३४७), दावडी १८३ (१४९१), शिरगाव २०५ (१३४७), मुळशी ९१ (६५८), माले ८८ (६१४), आंबवणे ११६ (१२८४).

Web Title: Todays Latest District Marathi News Mle22b00230 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..