मासेजाळी, शिलाई मशिनचे कातकरी बांधवांना वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेजाळी, शिलाई मशिनचे
कातकरी बांधवांना वाटप
मासेजाळी, शिलाई मशिनचे कातकरी बांधवांना वाटप

मासेजाळी, शिलाई मशिनचे कातकरी बांधवांना वाटप

sakal_logo
By

माले, ता. ८ ः कातकरी बांधवांचे स्‍थलांतर होऊ नये, त्‍यांच्‍या निवासस्‍थानीच त्‍यांचा विकास व्हावा, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी यावे, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव व संपर्क संस्था यांच्या माध्यमातून भोर, वेल्‍हे, मुळशीतील २८ कातकरी बांधवांना मासेजाळी व शिलाई मशिनचे वाटप आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्‍ते करण्‍यात आले.


यावेळी घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे वरिष्‍ठ निरीक्षक देशपांडे, संपर्क संस्थेचे विश्वस्त सदस्य किरण हुलावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजकुमार सिंग, मुळशी पंचायत समितीच्‍या माजी सभापती कोमल वाशिवले, मुळशी तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्‍यक्ष गंगाराम मातेरे, भांबर्डेचे माजी सरपंच विठ्ठल वायकर, तिस्‍करीचे माजी सरपंच अंकुश वाशिवले, बाळासाहेब चांदेरे, रुस्‍तमजी इराणी, अनंता वाशिवले, स्‍वाती वाशिवले, दत्तात्रेय चाळक, गोपाळ कदम, नीलेश कदम, प्रदीप वाडेकर, कृष्णा सरताडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्‍या निमित्ताने अनुजकुमार सिंग यांनी कातकरी बांधवांना कागदपत्रांची अडचण येत असल्‍याने त्या अनुषंगाने शिबिर घेण्‍याची मागणी केली. मागणीच्‍या अनुषंगाने ''दुर्गम भागात राहणा-या कातकरी बांधवांसाठी भांबर्डे, आंबवणे येथे लवकरात लवकर शासकीय यंत्रणेच्‍या माध्‍यमातून लाभ देण्‍यासाठी शिबिर लावण्‍यात येईल’, असे आश्‍वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

दरम्‍यान, आमदार थोपटे यांच्‍या विकास निधीतून संपर्क शाळेसाठी करण्‍यात आलेल्‍या अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण कोकणे यांनी केले. आयोजन घोडेगाव प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, सहायक प्रकल्‍प अधिकारी कैलास खेडकर, योजना अधिकारी सुहास शिंदे व कल्पेश रोकडे यांच्या माध्यमातून पार पडले
----

----