वडुस्‍ते,आंधळे शाळेस स्मार्ट टीव्ही भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडुस्‍ते,आंधळे शाळेस स्मार्ट टीव्ही भेट
वडुस्‍ते,आंधळे शाळेस स्मार्ट टीव्ही भेट

वडुस्‍ते,आंधळे शाळेस स्मार्ट टीव्ही भेट

sakal_logo
By

माले, ता.२०ः वडुस्‍ते व आंधळे (ता.मुळशी) येथील जिल्‍हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही संच भेट देण्यात आला. पुणे येथील एरंडवणेतील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ व गणेश पेठ येथील काळभैरवनाथ तरुण मंडळ यांना यासाठी विद्यार्थ्यांच्या ई लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे.

संजय महाजन, वेणू गोपाळ यांच्या सहकार्याने अत्‍यंत दुर्गम कैलासगडाच्‍या पायथ्‍याशी असलेले शाळेसाठी स्मार्ट टीव्ही संच देण्‍यात आला. यावेळी साईनाथ मंडळाचे पियुष शहा, काळभैरव नाथ तरुण मंडळाचे प्रमुख उमेश सपकाळ, शनी मारुती मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार यांनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ व पुस्तके वाटण्यात आली. जय गणेश व्यासपीठचे कुणाल पवार, अमित जाधव, राज पेंढारे, विश्व हिंदू मराठा संघाचे भूषण भाऊ वर्पे, वैभव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमाचे शिवसेनेचे युवा नेते अविनाश बलकवडे, मुळशी धरण भागाचे ज्येष्‍ठ नेते धुळाजी कोकरे यांनी कौतुक केले. तसेच आंधळे येथे सरपंच शंकर चव्हाण, यागेश पापळ, तंटामुक्तीचे चंद्रकांत मालपोटे, शिक्षण समिती उपाध्यक्ष धर्मदत्त साठे, सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड, हनुमंत मलपोटे, कैलास पवार, आदी उपस्थित होते. शिक्षिका वर्षा नलावडे यांनी आभार मानले.

00540