मुळशीसाठी पाणीसाठा आरक्षीत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीसाठी पाणीसाठा आरक्षीत करा
मुळशीसाठी पाणीसाठा आरक्षीत करा

मुळशीसाठी पाणीसाठा आरक्षीत करा

sakal_logo
By

माले, ता. २३ : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील वाढती गावे, गावांची वाढती लोकसंख्‍या व भविष्‍यातील गरज पाहता मुळशी धरणातून पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी वाढीव पाणीसाठा आरक्षित करावा,
अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे.
मुळशीतील गावांची पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी सन २००३ मध्‍ये मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना करण्‍यात आली. टाटा पॉवर कंपनी व महाराष्‍ट्र कृष्‍णा खोरे विकास महामंडळ यांच्‍यात पाण्‍याबाबत २.६९ एमएलडी पाणीसाठा आरक्षित ठेवण्‍यात आला. परंतु, टप्‍पा १ मध्‍ये समाविष्‍ट गावांची वेगाने वाढणारी लोकसंख्‍या, भविष्‍यात सन २०५४ पर्यंतची वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता वाढीव पाणीसाठा, तसेच टप्‍पा २मध्‍ये माण, हिंजवडी, कोळवण खोऱ्यातील गावांचा समावेश नियोजित आहे.
महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाकडून टप्‍पा १मधील वाढीव पाणी, तसेच टप्‍पा २करिता मिळून ९४.५० एमएलडी पाण्‍याची मागणी केली आहे. या वाढीव योजनेस शासनाने मुळशी धरणातून प्रशासकीय व तांत्रिक मान्‍यता दिली आहे. परंतु, या मान्‍यतेस टाटा कंपनीने हरकत घेतली आहे. तसेच, शासनास कायदेशीर नोटीस बजावली आहे.
याबाबत जिल्‍हा नियोजन समितीचे माजी सदस्‍य अमित कंधारे म्‍हणाले, ‘‘खासदार सुप्रिया सुळे यांच्‍या माध्यमातून लवकरच योग्‍य वाढीव पाणी आरक्षण मिळेल. तसेच, मुळशी तालुक्यातील वळकी व मुळा नदीवरील बंधारे दुरुस्तीसाठी निवेदन दिले आहे.’’
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान नाकती, मुळशी धरण भागाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार वाळूंज, भरतराव सातपुते आदी उपस्थित होते.

‘पाण्‍याचा उद्भवही तपासा’
टाटा पॉवर कंपनीने उपस्थित केलेले तांत्रिक व कायदेशीर मुद्दे लक्षात घेता मुळशी धरणातून पाण्‍याचा उद्भव की मुळशी मध्‍यम प्रकल्‍प संभवे बोगद्यातून मुळा नदीत सोडण्‍यात येणारे पाणी कोळवण खोऱ्याकरीता आणि कासारसाई धरणातून हिंजवडी-माण परिसराकरीता योग्‍य होईल किंवा याचीही तपासणी करण्‍याची मागणी केली आहे.