तरडोलीत सोसायटीच्या अध्यक्षपदी भापकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरडोलीत सोसायटीच्या
अध्यक्षपदी भापकर
तरडोलीत सोसायटीच्या अध्यक्षपदी भापकर

तरडोलीत सोसायटीच्या अध्यक्षपदी भापकर

sakal_logo
By

मोरगाव, ता. ३ : तरडोली (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी शारदा बाळकृष्ण भापकर तर उपाध्यक्षपदी अशोक निवृत्ती पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. बोबडे यांनी काम पाहिले. निवडणुकीनंतर अंतर्गत कमिटीत ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी फक्त अनुक्रमे भापकर आणि पवार यांचे अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. या वेळी संचालक विनायक गाडे, रमेश गाडे, वसंत भापकर, यशवंत भापकर, फुलचंद पवार, गौरी भोसले, प्रियांका भापकर, बेबी तांबोळी, किसन धायगुडे, रवींद्र साळवे, नवनाथ जाधव उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पॅनेलप्रमुख संजय भापकर, बाळकृष्ण भापकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00468 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top