
आंबी पाटी येथील अपघातात दांपत्याचा मृत्यू
मोरगाव, ता. १५ : मोरगाव- जेजुरी रस्त्यावर आंबी पाटी येथे वॅगनार गाडीची एका दुचाकीस धडक बसून दुचाकीवरील दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.
यासंदर्भात योगेश दत्तात्रेय कोलते (वय ३० वर्षे, रा. पिसर्वे ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी वॅगनार चालक दत्तात्रेय गजानन साळुंके (रा. वीर ता. पुरंदर जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. आंबी (ता. बारामती) गावाच्या हद्दीत जेजुरी-बारामती रोडवर जोगवडीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूकडे वळत असताना वॅगनार गाडी व मोटार सायकल यांची धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील बाळासाहेब मारुती कोलते (वय ४७ वर्ष) व कविता बाळासाहेब कोलते (वय ३८ वर्ष, दोघे रा. पिसर्वे ता. पुरंदर) या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वॅगनार चालकाने पलायन केले. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00478 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..