मुर्टीत मशिन चालक यादव यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुर्टीत मशिन चालक यादव यांचा सत्कार
मुर्टीत मशिन चालक यादव यांचा सत्कार

मुर्टीत मशिन चालक यादव यांचा सत्कार

sakal_logo
By

मोरगाव, ता. १८ : मुर्टी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशन आणि देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच साणसाचा मळा येथे ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले. येथे उत्कृष्ट पद्धतीने ओढा खोलीकरण व विहीर खोदाईचे काम केल्याबद्दल येथील शेतकऱ्यांनी मशिन चालक हरेंद्र यादव यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
बारामतीच्या पश्चिम भागात शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, तरडोली, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, चोपडज, भिलारवाडी, जळगाव क.प., कऱ्हावागज, येथे ओढा खोलीकरणासह विहीर खोदाईसाठी शेतकऱ्यांना मोफत मशिन उपलब्ध करून दिले आहे. २०१५ पासून मागणी असलेल्या गावात मशिन सातत्याने उपलब्ध होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी शर्मिला पवार यांच्याही सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


पोकलेन मशिनचे चालक हरेंद्र यादव व कल्याण उजगरे हे शेतकऱ्यांच्या शिवारात काम करताना मशिनचे चालक जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे काम करून जास्तीत जास्त पाणीसाठा कसा होईल व शेतकऱ्यांसाठी काम परिणामकारक कसे होईल. यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास जगदाळे, बाळासाहेब बालगुडे, सतीश जगदाळे यांनी दिली.


मुर्टी (ता.बारामती) : उत्कृष्ट पद्धतीने ओढा खोलीकरण केल्याबद्दल मशिन चालक महेंद्र यादव यांचा सत्कार करताना शेतकरी.

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00479 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top