मोरगावात विधवांना हळदी-कुंकवाचा मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरगावात विधवांना हळदी-कुंकवाचा मान
मोरगावात विधवांना हळदी-कुंकवाचा मान

मोरगावात विधवांना हळदी-कुंकवाचा मान

sakal_logo
By

मोरगाव, ता. ८ : मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज महिला विशेष सभा आयोजित केली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी नीलेश केदारी होते. या महिला ग्रामसभेला १०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. एक महिलाच एका महिलेला उत्कृष्ट पद्धतीने न्याय आणि सन्मान देवू शकते याची प्रत्यक्ष प्रचिती आजच्या ग्रामसभेत मोरगावकरांना आली. ग्रामसभेसाठी आलेल्या सर्व महिलांच्या आग्रही विनंतीवरून विधवा महिलांचा या ठिकाणी हळदी - कुंकू लावून त्यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
विधवा महिलांनीही प्रत्येक कार्यक्रमात हळदी कुंकवाचा मान देण्याचा ग्राम सभेमध्ये मोरगाव ग्रामपंचायतीने ठराव केला. ग्रामीण भागात व समाजात कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हळदी कुंकवासाठी बोलाविले जात नाही, त्यांच्याकडून हळद कुंकू लावून घेतले जात नाही, त्यांना सन्मान दिला जात नाही. मात्र, कुंकू हे प्रत्येक स्रीसाठी निसर्गाने दिलेली देणगी आणि सन्मान आहे. पतीच्या मृत्यूनंतर तिचा मान हिरावून घेणे हा तिच्यावर अन्याय असून हा अन्याय किमान मोरगावमध्ये तरी होऊन द्यायचा नाही अशी कणखर भूमिका येथील महिलांनी घेतली. समाजातील महिलांचे हक्क, न्याय आणि त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांचा सन्मान यासाठी येथील महिला कायम संघटित राहून काम करतील असे यावेळी येथील सुवर्णा धारक यांनी स्पष्ट केले. वैशाली मोरेश्वर धारक, पद्मावती कृष्णा कुंभार, निर्मला माणिक कांबळे या विधवा महिलांचा यावेळी हळदी कुंकू लावून आणि त्यांचे औक्षण करून सन्मान करण्यात आला. विधवा महिलांचा अशा प्रकारे प्रथमच होत असलेल्या सन्मानामुळे वैशाली धारक यांनी महिलांसह मोरगाव ग्रामपंचायतीचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या शुभांगी नेवसे, निशा तावरे, विद्या लव्हटे, वैशाली पालवे, सविता थोरात, महिला बचत गटाच्या मार्गदर्शक सुवर्णा धारक, मोरगावच्या पोलिस पाटील नयना नेवसे, मोरगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी जितेंद्र साळुंके आदी उपस्थित होते.
00940

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00541 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top