बारामतीत अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई
बारामतीत अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई

बारामतीत अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई

sakal_logo
By

मोरगाव, ता. ९ : बारामती तालुक्यात कऱ्हावागज येथे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई करण्यात आली.
कऱ्हावागज येथील वनक्षेत्रामध्ये प्रोसोपिस प्रजातीपासून तयार करण्यात आलेला कोळसा हा टेंपोमध्ये भरत असताना वनपालांनी जागेवरच पकडला. संबंधित वाहन चालकाकडे कोळसा वाहतुकीसाठी लागणारा निर्गत परवाना पास नसल्याने त्याच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदवून सदर वाहन जप्त केले आहे. याशिवाय मौजे लोणी भापकर येथील वनक्षेत्रालगत असणाऱ्या खासगी शेतजमिनीमध्ये विना परवानगी कोळसा भट्ट्या लावून कोळसा तयार करत असताना आढळून आल्याने वनगुन्हानोंदविण्यात आला. या प्रकरणात आरोपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00543 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..