शाश्र्वत पाण्यासाठी जलस्त्रोत खुले करणाऱ्या यंत्रणांचे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्र्वत पाण्यासाठी जलस्त्रोत खुले करणाऱ्या यंत्रणांचे योगदान
शाश्र्वत पाण्यासाठी जलस्त्रोत खुले करणाऱ्या यंत्रणांचे योगदान

शाश्र्वत पाण्यासाठी जलस्त्रोत खुले करणाऱ्या यंत्रणांचे योगदान

sakal_logo
By

मोरगाव, ता.११ :"निसर्गाच्या कृपेमुळे तरडोली तलाव, ओढे, नाले शंभर टक्के भरले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. निसर्गाबरोबर नैसर्गिक जलस्रोत खुले करण्यासाठी काम केलेल्या विविध यंत्रणांचेही मोठे योगदान आहे,'''' असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले.

तरडोली (ता. बारामती) येथील पाझर तलाव नुकताच पूर्ण क्षमतेने भरला. त्यातील पाण्याचे जलपूजन करताना ते बोलत होते. देवकाते पुढे म्हणाले की, जलसंधारण आणि जलस्त्रोत बळकटीकरणाच्या कामात आपण सगळेच कायम सातत्य ठेवू. त्यामुळे निसर्गाची साथ मिळून, जिरायत भाग कायम सुजलाम सुफलाम् राहील. तलावावर अवलंबून असलेल्या पाच गावांच्या विहीर नळ पाणी योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहेत. यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी फायदा होणार आहे. पाझर तलावावर तरडोली, मासाळवाडी, माळवाडी, बाबुर्डी, मोरगाव (काही भाग) या गावांच्या पिण्याच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. नाझरे धरण क्षेत्र, मोरगावसह परीसरात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरवात झाली असून, तब्बल दोन वर्षांनी तलाव भरला आहे. तलावातील पाण्याचे जलपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते व तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर यांच्या परडी आणि जलदेवतेची ओटी भरून करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक किसन तांबे, जिरायती भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत भापकर, माजी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, दत्तात्रेय पुणेकर, सतीश गायकवाड, विनायक गाडे, किसन भापकर, रामभाऊ शेरे, संजय भापकर उपस्थित होते.

01066

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00600 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..