''लंपी''पासून पशुधनाची काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''लंपी''पासून पशुधनाची काळजी घ्या
''लंपी''पासून पशुधनाची काळजी घ्या

''लंपी''पासून पशुधनाची काळजी घ्या

sakal_logo
By

मोरगाव, ता. ११ : पुणे जिल्ह्यातील लंपी त्वचा आजार हा संसर्गजन्य आजार वाढत आहे. या आजाराने संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ५% इतके आहे. यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे आवाहन मोरगाव पशुवैद्यकीय केंद्राचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. औदुंबर गावडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
वास्तविक, या आजाराचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे (डास, चावणाऱ्या माशा ,गोचीड,चिलटे) यांच्यामुळे होतो. बाधित जनावराचा स्पर्श निरोगी जनावरास झाल्यास तसेच दूषित चारापाण्यापासून आजार होतो. या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. जनावरांना या आजाराचा संसर्ग झाल्यास सुरुवातीस भरपूर ताप येतो, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येतात, लसिका ग्रंथींना सूज येते, अंगावर दहा ते वीस मिलिमीटर व्यासाच्या कडक गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो आणि यामुळे बाधित जनावराला अशक्तपणा येतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येऊन दृष्टी बाधित होते.दूध उत्पादन कमी होते.

या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुपालकांनी सर्व जनावरांवरती तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. बाधित जनावरे निरोगी जनावरापासून वेगळी ठेवावीत. डास, गोचिड व तत्सम किड्यांच्या बंदोबस्त करावा. लक्षणे आढळल्यास त्वरित जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच त्याने स्थानिक बाजारमध्ये नेण्यास प्रतिबंध करावा. मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, चांदगुडेवाडी, राजबाग तसेच शेरेवाडी या गावामध्ये जवळपास ५००० गायवर्गीय आणि महिषवर्गीय पशुधन आहे. या परिसरात आजपर्यंत लंपी त्वचा सदृश आजाराची एकही केस आढळून आली नाही.
- डॉ.औदुंबर गावडे, पशुधन विकास अधिकारी

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00601 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..