प्रशासनाकडून मुटी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाकडून मुटी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी
प्रशासनाकडून मुटी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी

प्रशासनाकडून मुटी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी

sakal_logo
By

मोरगाव, ता.११ : बारामतीच्या जिरायत भागातील मोरगाव, तरडोली, मुर्टी, वाकी, लोणी भापकर, मोराळवाडी, सायंबाचीवाडी भागातील पाझर तलाव, ओढे, नाले तुडुंब भरले असून नुकताच भरलेल्या पाणीसाठ्याच्या स्रोतांची पाहणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
तरडोली (ता.बारामती) येथील तलाव पावसाच्या पाण्याने पूर्ण भरला असून, त्यातून सांडव्याद्वारे अतिरिक्त पाणी चालू झाले आहे. वाकी आणि तरडोली येथील पूर्ण क्षमतेने भरलेल्या पाझर तलावाची पहाणी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामतीचे गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल यांनी केली. यावेळी तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक किसन तांबे, पुणे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचे माजी सदस्य हनुमंत भापकर ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, नवनाथ जगदाळे, संजय भापकर, सर्जेराव गाडे, उपसरपंच महेंद्र तांबे, सतीश गायकवाड उपस्थित होते.

वास्तविक, बारामतीच्या भागात पावसाच्या पाण्याशिवाय पाण्याची टंचाई आटोक्यात राहण्यासाठी दुसरा कोणताही प्रभावी उपाय उपलब्ध नाही त्यामुळे दरवर्षी बारामती तालुक्यातील प्रशासनाकडून टँकर ग्रस्त आणि पाण्याच्या टंचाईग्रस्त असलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त जलसंधारण आणि जलस्रोत बळकटीकरणाची कामे आवर्जून केली जातात टंचाई निवारणासाठी प्रतिबंधात्मक कृती आराखड्याप्रमाणे केलेल्या विविध कामांचा फायदा पावसाळ्यानंतर पुढील वर्षभरामध्ये होत असल्याची माहिती यावेळी बारामतीचे तहसीलदार पाटील यांनी दिली.

01070

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00602 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..