बारामतीची पश्‍चिम भागात दोन गाईंना लम्पीची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीची पश्‍चिम भागात
दोन गाईंना लम्पीची लागण
बारामतीची पश्‍चिम भागात दोन गाईंना लम्पीची लागण

बारामतीची पश्‍चिम भागात दोन गाईंना लम्पीची लागण

sakal_logo
By

मोरगाव, ता. २२ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेरेवाडी व आंबी खुर्द या गावांमध्ये दोन गाईंना लम्पीची लागण झाली असून, पशुसंवर्धन विभागाने सरसकट सर्व गाईंना लसीकरण करावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.
शेरेवाडी येथील एका गायीस लम्पीची लागण झाली असून, उपचारानंतर ती गाई धोक्याच्या बाहेर व सुरक्षित असल्याची माहिती मोरगाव पशुधन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. औदुंबर गावडे यांनी दिली, तर आंबी खुर्द या गावातही एका गाईस लम्पीची लागण झाली आहे. पशुधन केंद्रामार्फत त्या गाईवरही योग्य असे उपचार सुरू असून, ती धोक्याबाहेर व सुरक्षित असल्याची माहिती डॉ. गावडे यांनी दिली.
मोरगावच्या पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत सात गावांचा समावेश असून, त्यामध्ये मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, शेरेवाडी, राजबाग, चांदगुडेवाडी ही गावे येतात. या गावांच्या कार्यक्षेत्रात अंदाजे साडेचार हजार पशुधन असून, यामधील ३७०० गायींना लम्पी प्रतिबंधात्मक लस दिल्याची माहिती डॉ. गावडे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पशुपालक खासगी यंत्रणेकडून लसीकरण करून घेत होते. त्यानंतर बारामती दूध उत्पादक संघाने ही मोरगाव भागामध्ये काही प्रमाणात लसीकरण केले. सध्या पशुधन केंद्रामधून पशुधन विकास केंद्रामधून सरकारी लसीकरण सुरू झाले आहे. ज्या पशुपालकांनी पशुपालकांनी गाईवर्गीय पशुधनास लसीकरण केलेले नाही. त्यांनी त्वरित मोरगावच्या पशुधन विकास केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00614 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..