शेजाऱ्यांमुळे चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेजाऱ्यांमुळे चोरट्यांचा 
घरफोडीचा प्रयत्न फसला
शेजाऱ्यांमुळे चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला

शेजाऱ्यांमुळे चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला

sakal_logo
By

मोरगाव, ता. ३० : बारामती- मोरगाव मुख्य हमरस्त्यालगत तरडोली येथे आज दुपारी दीडच्या सुमारास विघ्नहर गाडे यांच्या बंद बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
बंगल्याचे दरवाजे फोडताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांनी पलायन केले. येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विघ्नहर गाडे हे कधी तरडोली तर कधी पुणे या ठिकाणी वास्तव्याला असतात. यापूर्वी दोन वेळा अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रकार केला होता. पहिल्यावेळी घरातील विविध साहित्य चोरीला गेले होते. तर दुसऱ्यावेळी बंगल्याचे दरवाजे उचकटले. मात्र, चोरट्यांनी कशाची चोरी केली नव्हती. आज तिसऱ्यांदा त्यांचे बंद अवस्थेतील बंगल्याचे पुढील व पाठीमागील दोन्ही दरवाजे चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने फोडले होते. मात्र, हा प्रकार पाहिल्यावर शेजारील लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे अज्ञात चोरटे यांनी रस्त्यालगत उभा केलेल्या चारचाकी मधून पलायन केले येथील नागरिकांनी या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख, मोरगाव पोलिस मदत केंद्राचे वसंत वाघोले, संदीप लोंढे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. येथील बाळासाहेब गाडे या युवकानी दुचाकीवरून चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी वेगाने गेल्यामुळे कोणतीही भरीव माहिती हाती लागली नाही.