मोरगाव पुरवणी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरगाव पुरवणी लेख
मोरगाव पुरवणी लेख

मोरगाव पुरवणी लेख

sakal_logo
By

मनोरथ पूर्ण करणारी देवता म्हणजे श्री मयुरेश्वर

''मनी इच्छिले मोरया देत आहे !!'' या उक्तीप्रमाणे सर्व गणेश भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी देवता म्हणजे श्रीक्षेत्र मोरगावचा श्री मयुरेश्वर..... अष्टविनायकामध्ये सर्वाद्य क्षेत्र अशी ज्या क्षेत्राची ख्याती महती आहे असे श्री मयुरेश्वर क्षेत्र .... भूतलावरील गणेशाचा स्वानंद लोक म्हणजे श्रीमयुरेश्वर क्षेत्र ... श्री मयुरेश्वर क्षेत्रामध्ये वर्षभरामध्ये साजरे होणारे उत्सव यात्रा यांना विशिष्ट वंश परंपरागत परंपरा आहे. मुद्गल पुराणांमध्ये या क्षेत्राचे विस्तृतपणे वर्णन श्री महान गणपती गणेश योगेंद्र यांनी केले आहे. भाद्रपद यात्रा, माघी यात्रा आणि दसरा सोहळा हे मानाचे उत्सव आहेत.
...............................
भाद्रपद आणि माघ यात्रेत प्रतिपदा ते चतुर्थी चार दिवस भाविकांना स्वहस्ते स्नानाची पर्वणी साधता येते. पूर्वेला धर्ममंडप, पश्चिमेस काममंडप, दक्षिणेस अर्थमंडप आणि उत्तरेस मोक्षमंडप अशी द्वारमंदिरे असून चार दिवसांची द्वारयात्रा अनवाणी चालत जाऊन केली जाते. शिवाय मोरगावचा व श्री मयुरेश्वराचा क्षेत्रपाल म्हणून श्री नग्नभैरवनाथ देवतेचे व मंदिराचे खास महत्त्व आहे.

पन्नास फूट उंचीवरील चौथऱ्यावर वसले मंदिर
पुणे शहरापासून साधारणतः ६५ किमी अंतरावर बारामती तालुक्यात मोरगाव हे अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र आहे.अष्टविनायकातील मानाचा गणपती म्हणून मयुरेश्वरास मानले जाते. येथे अनेक साधू व संतांनी तपश्चर्या केले असल्याचा दाखला काही ग्रंथांमधून आपल्यास मिळतो. गावामध्ये मध्यभागी मयुरेश्वराचे मंदिर आहे. जमिनीपासून साधारणतः पन्नास फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर हे मंदिर वसले आहे. गावाचा आकार मोरासारखा असून, येथे मोरांची संख्या अधिक असल्याने गावास मोरगांव हे नाव पडले.

मंदिराच्या कोपऱ्यावर चार मशिदीप्रमाणे मिनार
मंदिर बांधणी अथवा निर्मिती विषयी नेमक्या नोंदी आढळून येत नसल्या तरी मूर्तीची स्थापना ब्रम्हा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंच देवतांनी केली असल्याचे मानले जाते. म्हणून या गणपतीस स्वयंभू गणपती मानतात. याच कारणाने आजही गेल्या शेकडो वर्षांपासून गावात घरात अथवा सार्वजनिक गणपती बसविला जात नाही. उत्सव काळात याच गणपतीची पूजा ग्रामस्थ व येथील भक्त करतात. तर ऐतिहासिक दाखल्यानुसार मंदिर बांधणी बहामनी राजवटीत झाली असल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे. आदिलशाही काळात सरदार गोरे यांनी बांधणी केली आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार मशिदीप्रमाणे मिनार होते. मोगल राजवटीचे राज्य असताना मंदिरावर कोणी अतिक्रमण करू नये या उद्देशाने हे बांधले असल्याचे अनेक जुन्या जाणकारांचे मत आहे.

शिखर साधारणतः ६० फूट उंच
पुरातन काळात सिंध नावाच्या राक्षसाने पृथ्वी, स्वर्ग व पातळ येथे उन्माद माजवला होता. यामुळे सर्व देवतांनी गणपतीची आराधना केली. भगवान गणेश व सिंध राक्षसाच्या झालेल्या युद्धात गणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधाचा वध केल्यामुळे या गणपतीस मयुरेश्वर या नावाने संबोधले जाऊ लागले. मयुरेश्वर मुर्ती शेजारी हलवता येण्यासारख्या सिद्धी- बुद्धी मूर्ती आहेत तर डोक्यावर नागाचा फणा, बेंबीत हिरा आहे. मंदिर शिखर साधारणतः ६० फूट उंच आहे. मुख्य मंदिर गर्भगृह, दर्शन मंडप, सभामंडप अशा तीन भागांमध्ये विभागले आहे.

केवळ दर्शनाने काशी यात्रेचे पुण्य
तीर्थक्षेत्री प्रत्यक्ष ब्रम्हदेवाने तपश्चर्या केली असून, त्यांच्या हातून कलंडुन ब्रम्हकमंडलू कऱ्हागंगाची निर्मिती झाली आहे. गणपती अंकुशाने नदी पात्रात येथे पाच मैल अंतरावर श्री गणेशकुंड, ऋषीतीर्थ, श्री गणेशगया तीर्थ, कपिल तीर्थ, व्यास तीर्थ, सर्वपुण्यतिर्थ, भीमतीर्थ अशा सात तिर्थांची निर्मिती झाली होती. पैकी आजही काही तीर्थ पहावयास मिळतात. याच्या केवळ दर्शनाने काशी यात्रेचे पुण्य होते. याच मंदिरात रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमानाच्या मूर्तीसमोर सुखकर्ता दुखहर्ता ही आरती त्यांना स्फुरली आहे.
वर्षभरात येथे भाद्रपद यात्रा उत्सव, माघ यात्रा, विजयादशमी, हे मोठे सोहळे संपन्न होतात. यात्रा कालावधीत लाखो भक्त मयुरेश्वराचे दर्शन घेतात. तर दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला हजारो भाविकांची मांदियाळी असते .


....

मोरगावचा ऐतिहासिक शाही दसरा
श्री मयुरेश्वर क्षेत्रामध्ये साजरा होणारा उत्सव म्हणजे विजयादशमी या उत्सवाला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक महत्त्व आहे या उत्सवाला मर्दानी शाही दसरा म्हणून संबोधले जाते मोरगावच्या ऐतिहासिक दसऱ्याची शेकडो वर्षाची परंपरा मोरगावकर आजही मोठ्या श्रद्धेने अखंडपणे साजरी करतात अंदाजे 750 वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे या उत्सवाला छत्रपती शिवरायांची ओळख आहे परंपरा आहे महाराजांच्या काळामध्ये श्री मयुरेश्वराला मिळालेला तोफखाना आहे. श्री शाहू छत्रपती महाराज सातारकर थोरली गादी यांनी खूप देवस्थानच्या परंपरेची परंपरा अखंडपणे चालू राहण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. श्री क्षेत्र मोरगाव येथील मोरगावकरांची वंशावळ वाचण्याचा मान मुजुमदार श्री. शैलेश वाघ यांच्या घराण्याकडे वंशपरंपरेने चालू आहे. सोनेश्वर मंदिरात हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थांना, आप्तेष्टांना सोन्याचे वाटप देऊन प्रेमाने आलिंगन देतात दसरा उत्सवातील श्री मयुरेश्वर पालखी सोहळ्यासमोर शोभेच्या दारूची होणारी आतषबाजी आणि सीमोल्लंघन सोहळा हे दसऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे दसऱ्याच्या दिवशी पहाटे मानाच्या तोफांची पूजा करून तोफांची सलामी दिले जाते. सकाळी नऊला मंदिरासमोर ग्रामस्थांची विशेष बैठक होऊन 24 तास चालणाऱ्या दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन योग्य पद्धतीने समन्वय सुसंवाद करून केले जाते. सकाळी दहाला दसरा सोहळ्यातील सेवेकऱ्यांना मानाचे शिधावाटप केले जाते. रात्री पुन्हा आठ ला पाच तोफांची सलामी दिले जाते रात्री नऊला पालखीचे प्रस्थान कऱ्हा नदीकडे होते. यावेळी भुईनळ्यांच्या माध्यमातून शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते पवळी येथे आल्यानंतर सर्वजण
हरमळीचा खेळ खेळतात रात्री साडेअकराला रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते पहाटे साडेचारला गावातील सोनोबा मंदिरात पालखी आल्यानंतर वंशावळ वाचनाचा कार्यक्रम होतो यावेळी आपटा पूजन करून ग्रामस्थ आप्तेष्टांना भेटी देतात संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घेऊन सर्व मंदिरांना भेटी देऊन सर्व रथासह पालखी मंदिरात आणली जाते त्यानंतर आरती होते दसऱ्याचा सोहळा रात्रभर असल्यामुळे दसरा उत्सवांमध्ये काम करणारे सर्व सेवेकरी भाविक नागरिक पंचक्रोशीतील ग्रामस्थ हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात दसरा उत्सव यामध्ये प्रत्येक जण पडेल ते काम आपला मोठा मान आहे ही श्रद्धा पूर्व भावना ठेवून काम करतात.
दसरा सोहळ्यानिमित्त सर्व नागरिक सेवेकरी, भाविक यांना मोरगावकरांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा
- श्री मयुरेश्वर दसरा उत्सव समिती समस्त मोरगावकर.