‘अपघाताचा धोका असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अपघाताचा धोका असलेल्या
ठिकाणी गतिरोधक बसवा’
‘अपघाताचा धोका असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवा’

‘अपघाताचा धोका असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवा’

sakal_logo
By

मोरगाव, ता. २१ : बारामती-पुणे-मोरगाव मार्गे रस्त्यावर काही ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी प्रवाशांमधून व वाहन चालकांमधून होत आहे. यासंदर्भात मोरगाव, तरडोली, आंबी, जळगाव येथील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गतिरोधक बनवावे, यासाठी निवेदन दिले आहे.

पायाभूत सुविधा भाग म्हणून दरवर्षी रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध होतो. या रस्त्यावर मोरगावमध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री मयुरेश्वर विद्यालय आहे. तरडोलीमध्ये रस्त्यालगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. माळवाडी, तरडोली मरिमाता मंदिर वळण, पवारवाडी पाटी, आंबी पाटी, गावे जोडणारे वळण, मावडी क. प. येथे गेली अनेक वर्षांपासून अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत. या अपघातांत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे अजूनही या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक किंवा अपघात टाळण्यासाठी कोणत्याही आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

एकीकडे कमी वेळेत प्रवासाचे अंतर कापण्यासाठी वेगवान आणि सुसज्ज रस्ता म्हणून बारामती-मोरगावमार्गे पुणे मार्ग वापरला जातो. मात्र, दुसरीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वळणांमुळे हा रस्ता अपघातग्रस्तांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमांची पूर्तता करून वारंवार अपघात होत असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. यासंदर्भात मोरगाव, तरडोली, आंबी, जळगाव येथील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गतिरोधक बनवावे यासाठी निवेदन दिले आहे.