ई पीक पाहणी ॲपवर माहिती भरणे वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई पीक पाहणी ॲपवर माहिती भरणे वेगात
ई पीक पाहणी ॲपवर माहिती भरणे वेगात

ई पीक पाहणी ॲपवर माहिती भरणे वेगात

sakal_logo
By

मोरगाव, ता. २५ : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात परतीच्या पावसामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी ॲपवर नुकसानीचे फोटो काढून माहिती भरण्याचे काम वेगात सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक पहाणी ॲपवर नुकसानीची माहिती भरली नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसान झालेल्या पिकाचा फोटो काढून ॲपवर टाकावा व आवश्यक असलेली कागदपत्रे संबंधित ठिकाणच्या गावकामगार तलाठी यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन मोरगावचे मंडल अधिकारी निळकंठ मुळे यांनी केले आहे.
मुर्टी ग्रामपंचायतीकडून गावाच्या कार्यक्षेत्रात जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी अॅपवर पिकांची नोंद करून पिकांचे नोट कॅमेरात काढलेला फोटो, पीक पंचनामा फॉर्म, आधार कार्ड झेरॉक्स, बॅंक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, सातबारा आठ अ, सर्व कागदपत्रे गावकामगार तलाठी यांच्याकडे जमा करण्यासाठी गेली आठ दिवसापासून जनजागृती केली जात आहे. नुकसान झालेली कागदपत्रे जमा न केल्यास नुकसानभरपाई अनुदानासाठी पात्र राहणार नसल्याचे बारामती महसूल विभागाकडून स्पष्ट केले आहे. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी बारामती तालुक्यात ज्या ज्या गावात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश गावकामगार तलाठी व कृषीसहायक यांना दिले आहेत. नुकताच मुर्टी येथील झालेल्या नुकसानीची पहाणी गावकामगार तलाठी प्रवीण जोजारे यांनी केली यावेळी बाळासाहेब बालगुडे, मोहन बालगुडे उपस्थित होते.

01160