तरडोली येथे बंद घरातून दीड लाखांचा ऐवज चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरडोली येथे बंद घरातून
दीड लाखांचा ऐवज चोरी
तरडोली येथे बंद घरातून दीड लाखांचा ऐवज चोरी

तरडोली येथे बंद घरातून दीड लाखांचा ऐवज चोरी

sakal_logo
By

मोरगाव, ता. १३ : बारामती तालुक्यातील तरडोली येथे चोरट्यांनी रविवारी (ता. १३) बंद घराची रेकी करून घरफोडी केली. त्यात अंगठी, चैन, बदाम असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला.
चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री तरडोली येथील वसंत दगडू कदम यांच्या राहत्या घरी कोणीही नसण्याची खात्री करून गेटचा मुख्य दरवाजा तोडला. त्यानंतर बंद घराचे व बेडरूमचे कुलूप तोडून कपाटातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व वीस ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, बदाम, असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीबाबतची तक्रार त्यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे.