पाझर तलाव जोडप्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाझर तलाव जोडप्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
पाझर तलाव जोडप्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

पाझर तलाव जोडप्रकल्प ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

sakal_logo
By

मोरगाव, ता.२१० : बारामतीच्या जिरायती भागासाठी तरडोली पाझर आणि पुरंदर उपसा जलसिंचन योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. तलाव व जलसिंचन योजना जोड प्रकल्पाच्या पाइन लाइन कामाचा पहिला टप्प्याचा प्रारंभ झाला. ''सीएसआर'' फंडाचे समन्वयक सिद्धांत इंगळे यांच्या हस्ते कामास सुरुवात तरडोली (ता. बारामती) येथे करण्यात आली.
जोड प्रकल्पाच्या कामासाठी गेली काही वर्षापासून जलव्यवस्थापन समितीचे माजी सदस्य हनुमंत भापकर यांनी सातत्याने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या योजनेमुळे दुष्काळी परिस्थितीत कायम पाणी मिळणार आहे. यासाठी टाटा ग्रुपने पवार यांच्या सूचनेनुसार एक कोटी ३० लाख रुपयांचा निधी दिला. यात एक किलोमीटर पाइपलाइनचे काम होणार आहे. वास्तविक, तरडोली तलावावर या परिसरातील जवळपास साडे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. हा तलाव नाझरे धरणाच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे या पुरंदर उपसा योजनेचे पाणी मिळण्यास अडथळा येत होता. शेजारी मोरगाव, भोइटेवाडीला पाणी येवूनही तरडोलीकर पाण्यापासून वंचित होते. पाऊस जास्त होऊन नाझरे धरण पूर्ण भरले तरच अतिरिक्त पाणी तरडोली तलावात सोडले जाते. शाश्वत पाण्यासाठी पुरंदर योजना महत्त्वपूर्ण असल्याने येथील शेतकऱ्यांच्या व जिरायती भाग पाणी परिषदेच्या सातत्याच्या मागणीमुळे अजित पवार यांनी येथील पाइपलाइनच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात निधी उपलब्ध करून दिला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक किसन तांबे, हनुमंत भापकर, उपसरपंच महेंद्र तांबे, नवनाथ जगदाळे, संतोष चौधरी, स्वाती गायकवाड, रामचंद्र भोसले, जनार्दन निंबाळकर ,जालिंदर गरूड, मंगेश खताळ ,सचिन गारडे, संतोष भोईटे, संजय भापकर आदी उपस्थित होते.

शेती कसण्यासाठी पाणी महत्त्वाचा आणि गरजेचा घटक आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे पुरंदर योजना व तलाव जोडप्रकल्पाचे काम सुरू झाले. यामुळे शेतीसाठी शाश्वत पाणी मिळणार आहे. तरडोलीकर कायम पवार व टाटा ग्रुप यांच्या ऋणात राहू.
-विद्या भापकर, सरपंच, तरडोली

01208