मोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरगाव ग्रामपंचायतीच्या
सरपंच, सदस्यांना दिलासा
मोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांना दिलासा

मोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांना दिलासा

sakal_logo
By

मोरगाव, ता. २१ : मोरगाव (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांना थकबाकीमुळे अपात्र ठरवण्यात यावे, अशी तक्रार मोरगावचे माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांचा तक्रारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी केलेल्या चौकशीनंतर फेटाळला.
बिले दिल्यानंतर मुदतीत कर न भरल्यामुळे विद्यमान सरपंचांसह अकरा सदस्य अपात्र होत असल्याची तक्रार माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी दाखल केली होती. तत्पूर्वी, त्यांनी बारामतीचे तत्कालीन गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडेही ही तक्रार दाखल केली होती. दोन वर्षांतील दफ्तरी तपासणीनंतर संबंधित अकरा सदस्य अपात्र होत असल्याचा अहवाल काळभोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. यामध्ये विद्यमान सरपंच नीलेश हरिभाऊ केदारी, शुभांगी विजय नेवसे, वैशाली दत्तात्रेय पालवे, कविता विद्याधर वाघ, दिगंबर त्रिंबक तावरे, संतोष लक्ष्मण नेवसे, निशा सोमनाथ तावरे, अजित राजेंद्र रणदिवे, विद्या आनंद लव्हटे, विद्या वैभव तावरे, कैलास सर्जेराव तावरे यांचा समावेश आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी असा कर ग्रामपंचायतीने बिले बजावूनही वेळेत भरला नसल्याचा ठपका ढोले यांनी ठेवला. त्यामुळे ते नियमानुसार अपात्र ठरत असल्याचे ढोले यांचे म्हणणे आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा विवाद अर्ज, बारामती पंचायत समितीकडून आलेला अहवाल व वस्तुस्थिती यांची पडताळणी करून फेटाळला.