दुरुस्तीमुळे भरले मोरगाव, तरडोलीतील बंधारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुरुस्तीमुळे भरले मोरगाव, तरडोलीतील बंधारे
दुरुस्तीमुळे भरले मोरगाव, तरडोलीतील बंधारे

दुरुस्तीमुळे भरले मोरगाव, तरडोलीतील बंधारे

sakal_logo
By

मोरगाव, ता.२२ : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कऱ्हा नदीवर बंधाऱ्यांचे भराव अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे फुटले होते. ते वेळेत दुरुस्त केल्यामुळे मोरगाव, तरडोली परिसरातील बंधाऱ्यांमध्ये तुडूंब भरले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे बंधारे पाटबंधारे विभागाने नुकसानीच दुरुस्ती करून कसरतीने वेळेत भरले आहेत. यामुळे जलस्रोत बळकटीकरण व शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. तरडोली बंधारा ९० टक्के , ढोपरे मळा ८५ टक्के, साळोबाडोह ६० टक्के, मोरगाव शंभर टक्के, आंबी बुद्रुक अंतर्गत जगताप वस्ती ६० टक्के , आंबी बुद्रुक अंतर्गत माळवाडी ६० टक्के असे बंधारे पाटबंधारे विभागाने भरले आहेत. अतिवृष्टीमुळे भरावा फुटून जवळपास प्रत्येक बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ते दुरुस्त केले नसते तर शेतकऱ्यांवर वाहून गेलेले पाणी पाहण्याची वेळ आली असती. त्याचा शेती सिंचनासाठी काहीच उपयोग झाला नसता. त्यामुळे भरावे तातडीने दुरुस्त करावे व पाणी आडवावे अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे पवार यांनी स्वतः बंधाऱ्यांची पाहणी केली व येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर यांत्रिकी विभागाचे पोकलेन व डंपर उपलब्ध करून दिले. त्यामुळे पूर्ण बंधाऱ्यांचे भरावे पाटबंधारे विभागाने त्वरित दुरुस्त केले.
दरम्यान, बंधाऱ्यात अडवलेल्या पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना व चारा पिकांना भरीव फायदा होणार असल्याची माहिती आंबी बुद्रुकचे सरपंच प्रवीण शिर्के, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी, तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर यांनी दिली.

शंभर टक्के बंधारे भरण्याचे नियोजन
सध्या प्रत्येक बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा तयार झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या पुरामुळे अल्प प्रमाणात ढापे वाहून गेले आहेत त्या ठिकाणी बंधारे शंभर टक्के भरण्यासाठी जिथे जिथे ढाप्यांची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ढापे उपलब्ध करून शंभर टक्के बंधारे पुढील पंधरा दिवसात भरण्याचे नियोजन केले असल्याची माहिती नाझरे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अनिल घोडके यांनी दिली.

01211