लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोरगावच्या कीर्ती ढोले हिचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत
मोरगावच्या कीर्ती ढोले हिचे यश
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोरगावच्या कीर्ती ढोले हिचे यश

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोरगावच्या कीर्ती ढोले हिचे यश

sakal_logo
By

मोरगाव, ता. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलींमध्ये अकरावा नंबर मिळवून मोरगाव येथील शेतकरी कुटुंबातील कीर्ती बाळासाहेब ढोले या मुलीने स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर (एसआयटी) होण्याचा मान मिळवला. कीर्ती ही मोरगावमधील शेतकरी कुटुंबातील मुलगी असून वडील बाळासाहेब ढोले माजी सैनिक तर आई गृहिणी आहे. कीर्तीचे प्राथमिक शिक्षण मोरगाव येथील ढोलेमळ्यात तर माध्यमिक शिक्षण श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथे झाले. पुण्यात पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला अपयश आले. मात्र, आई आणि वडील यांनी सातत्याने सकारात्मक ऊर्जा देत तू नक्कीच तुझे ध्येय मिळवू शकतेस फक्त अखंड प्रयत्न करत रहा, असा धीर दिल्यामुळे माझा आत्मविश्वास आणि जिद्द वाढली आणि या परिक्षेत मी यशस्वी झाले असे कीर्तीने सांगितले. याचे श्रेय कीर्ती आई वडील आणि चुलते मोरगावचे माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांना देते. तिच्या निवडीनंतर तिचे मोरगावसह परिसरातून कौतुक होत आहे. जन्मभूमी असलेल्या मोरगाव गावासाठी नक्कीच सामाजिक बांधिलकीतून भरीव योगदान देणार असल्याचे कीर्तीने आवर्जून सांगितले.