मोरगाव येथे संस्कार व्याख्यानमाला

मोरगाव येथे संस्कार व्याख्यानमाला

मोरगाव, ता. २४ : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे संस्कार व्याख्यानमाला २०२३चे मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिरासमोर आयोजन करण्यात आले होते.
पहिले पुष्प गुंफताना सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकाराबाबत ‘नागरिकांनो सजग व्हा’ या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले.
वेलणकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एमएससीबी, बँका, इन्शुरन्स कंपनी, टोल विषय, हॉस्पिटल, वेगवेगळे शासकीय कार्यालय यामध्ये माहितीचा अधिकार कसा वापरला पाहिजे याबाबत माहिती दिली. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांनी यावेळी आपल्या मनातील अनेक प्रश्न मांडले. वेलणकर यांनी सर्व शंका आणि प्रश्न यावर समाधानकारक उत्तरे देवून नागरिकांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे होते. डॉ. पांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पक्षिशास्त्र व पर्यावरणा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मोरगावच्या विद्यमान सरपंच अलका तावरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत शिंदे, वक्ता परिचय अजित गुंड यांनी केला. आभार राहुल रणदिवे यांनी मानले. सूत्रसंचालन गणेश कुंभार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com