Tue, October 3, 2023

जोगवडी येथील सरपंच
महानवर यांचा राजीनामा
जोगवडी येथील सरपंच महानवर यांचा राजीनामा
Published on : 4 May 2023, 9:26 am
मोरगाव, ता. ४ : जोगवडी (ता. बारामती) येथील सरपंच प्रभू नारायण महानवर यांनी ठरलेला कालावधी पूर्ण झाल्याने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
महानवर यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा बारामती पंचायत समितीकडे दिला असून, सध्या येथील कामकाज ग्रामसेवक रवींद्र माळशिकारे हे पाहत आहेत. नियमानुसार पुन्हा सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी अंतर्गत कमिटीत ठरलेल्या कालावधीप्रमाणे सरपंच म्हणून सारिका संतोष महानवर यांच्या नावाची चर्चा आहे.