
जळितग्रस्त समिंदर कुटुंबाला मदतीचा हात
मांडवगण फराटा, ता. ९ : आगीमुळे संपूर्ण संसार उघड्यावर आलेल्या येथील जुना मळा परिसरातील समिंदर कुटुंबाला मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातील दानशूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयाचे संस्थापक राजीव पाटील फराटे यांनी तातडीने संबंधित जळितग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन संसारोपयोगी साहित्य, किराणा, कपडे व भांडी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून राजीव फराटे पाटील हे या परिसरातील जळीतग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देत आहेत. जुना मळा येथील रामचंद्र समिंदर यांचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान त्यांच्या झोपडीला आग लागली होती. त्यात झोपडीतील अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम तसेच मंडपाचे साहित्य जळून खाक झाले होते. या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच अनेक स्थानिक ग्रामस्थ या जळीतग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले. कुणी रोख रक्कम तर कुणी धान्याची मदत केली. शिरूर हवेली मित्र परिवार व्हॉट्सॲप ग्रुप देखील मदतीसाठी पुढे सरसावला. यावेळी श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, प्राचार्य हेमंत कांबळे, आत्माराम फराटे, डॉ. ज्ञानदेव फराटे, सचिन फराटे पाटील, रमेश मोरे, पंडित जाधव, बाबासाहेब फराटे, अशोक फराटे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00482 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..